'हम आपके है कौन'ला 20 वर्ष पूर्ण

सुरज बडजात्या दिग्दर्शित 'हम आपके है कौन' या सिनेमाला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. माधुरी दीक्षित, सलमान खान, रिमा, अलोकनाथसारखी तगडी स्टारकास्ट, धमाकेदार संगीत, अफलातून गाणी, आणि सहजसोपी घडणारी गोष्ट असलेल्या या सिनेमाने आजही प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. 

Updated: Aug 5, 2014, 11:34 PM IST
'हम आपके है कौन'ला 20 वर्ष पूर्ण title=

मुंबई : सुरज बडजात्या दिग्दर्शित 'हम आपके है कौन' या सिनेमाला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. माधुरी दीक्षित, सलमान खान, रिमा, अलोकनाथसारखी तगडी स्टारकास्ट, धमाकेदार संगीत, अफलातून गाणी, आणि सहजसोपी घडणारी गोष्ट असलेल्या या सिनेमाने आजही प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. 

5 ऑगस्ट 1994 साली आलेल्या या सिनेमाने एकंच धमाल उडवून दिली होती. बॉक्स ऑफिसची सारी गणितचं या सिनेमाने पार बदलून टाकली होती. कोणत्याहीप्रकारे हाणामारी नाही, सध्याच्या सिनेमांसारखे स्टंट्स आणि अँक्शनचा भडीमार नाही मात्र तरीही या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली.

सहजसोपी अशी प्रेमकहाणी आणि या प्रेमकहाणीला जोड कौटुंबिक कथेची.. प्रेम आणि निशाभोवती फिरणारी सिनेमाची कथा. लग्नाचा व्हिडीओ म्हणूनही या सिनेमाला संबोधण्यात आलं होतं, असं सगळं असूनही सिनेमाने प्रेक्षकांना भुरळ घातली.

माधुरी दीक्षित, सलमान खान, अलोकनाथ, रिमा, रेणूका शहाणे, मोहनीश बहेल, अजित वाच्छानी, बिंदू, हिमानी शिवपुरी अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात होती.

राम-लक्ष्मण यांचं उत्कृष्ट संगीत ही सिनेमाची जमेची बाजू, विशेष म्हणजे या सिनेमात प्रत्येक सण, लग्नातला प्रत्येक विधी, परंपरा अगदी सुंदर पद्धतीने दाखवण्यात आली... आज या सिनेमाने 20 वर्ष पूर्ण केलीयेत. मात्र, सिनेमाची जादू आजही कायम आहे.

आजही निशा-प्रेमची ही प्रेमकहाणी प्रेक्षक आवर्जून पहातात. सिनेमातली गाणी आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत.. एकूणंच काय काळ बदलला, सिनेमाची व्याख्या बदलली, मात्र, काही सिनेमे माईलस्टोन असतात ते कधीच बदलत नाहीत, त्यांची जादू कधीच कमी होत नाही.
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.