चिकन- मटणहूनही जास्त प्रभावी... शाकाहारी आहात तर 'हे' प्रथिनंयुक्त पदार्थ नक्की खा

High Protien Food Vegetarian : जे लोक मांसाहारी असतात त्यांना प्राण्यांच्या मार्फत प्रथिने मिळतात पण जे लोक शाकाहारी असतात त्यांना  प्रथिन्यांची कमी जाणवते. अशावेळी आहारात या खास पदार्थाचा समावेश करावा. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 4, 2024, 02:44 PM IST
चिकन- मटणहूनही जास्त प्रभावी... शाकाहारी आहात तर 'हे' प्रथिनंयुक्त पदार्थ नक्की खा

 प्रथिन्यांची कमी ही सर्वात जास्त शाकाहारी लोकांमध्ये आढळून येते. प्रथिन्यांनसोबत अन्य पोषक तत्वाची देखील गरज असते कारण शाकाहारी पदार्थांमध्ये कमी प्रमाणत प्रथिने असतात. तर नॉनव्हेजमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात . त्यामुळे शरीराला निरोगी आणि सक्रिय ठेवण्यास मदत होते  प्रथिनं शरिरात कमी असतील तर थकवा , केस गळती, जास्त भूक लागणे, कोरडी त्वचा यांसारखा लक्षणे दिसून येते. म्हणून शाकाहारी लोकांची त्यांचा आहारात टोफू किंवा पनीरचा समावेश करावा. 

Add Zee News as a Preferred Source

टोफू काय असते ?  

टोफू हे सोयाबिनच्या दूधापासून बनवले जाते. टोफूचे सेवन करणे हे आरोग्यास खूप लाभदायक असते. बऱ्याचं लोकांना टोफू काय असते हे माहितचं नसते. टोफूचे दुसरे नाव 'सोया पनीर' आहे, जे सोया दुधाच्या दह्यापासून बनवले जाते. 

टोफूमध्ये असलेले पोषक तत्व

टोफूमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात.  100 ग्राम टोफूमध्ये 8 ग्राम प्रथिने , 65 कॅलरीज , 7 मिलिग्रॅम सोडियम , 121 मिलिग्रॅम पोटॅशियम आणि 0.3 ग्राम फायबर्स असतात. या शिवाय 30 टक्के कॅल्शियम आणि 7 टक्के मॅग्नेशियम असते . 

टोफू खाण्याचे फायदे 

टोफू खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. हृदयास खूप फायदेमंद असते. धमन्यांना निरोगी ठेवते . 
टोफू खाल्ल्यानं कर्करोग सारख्या आजारावर मात करतं. अँटिऑक्सिडेंट्स भरपूर असल्याने कर्करोग शरीरात पसरण्यास थांबते. 
टोफूमुळे वजन देखील नियंत्रणात राहते. कॅलरीज कमी आणि उच्च प्रथिने असल्यानं वजन नियंत्रणात राहते. टोफूचे सेवन केल्यास लवकर वजन वाढत नाही.
हाडांना मजबूत ठेवण्यास मदत होते. ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्या कमी उद्भवू लागतात. 
तोफूमुळे पांचनसंस्था मजबूत होते , टोफू मध्ये असलेले फायबर्स मुळे मेंदूचे स्वास्थ्य सुधारण्यात मदत होते .   

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. )

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More