अजून मी सिंगल – अर्जुन कपूर

अभिनेता अर्जुन कपूरनं सध्या सिंगल आहे... असा दावा आम्ही नाही तर तो स्वत:च म्हणतोय. 

Updated: Sep 6, 2014, 08:13 PM IST
अजून मी सिंगल – अर्जुन कपूर title=

मुंबई : अभिनेता अर्जुन कपूरनं सध्या सिंगल आहे... असा दावा आम्ही नाही तर तो स्वत:च म्हणतोय. 

मी सध्या कोणात्याही मुलीला डेट करत नाहीय’ असं अर्जुननं एका मुलाखतीत म्हटलंय. स्वत:बद्दल सांगताना अर्जुन म्हणतो, ‘मी वैयक्तिक जिवनात खूप चढ-उतार बघितलेत. जेव्हा माझं वजन हे माझ्यासाठी एक मोठी समस्या झाली होती... तेव्हा माझा फिटनेसनं माझ्यासमोर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं होतं... पण, आयुष्यातील या प्रसंगांदरम्यान खूप काही गोष्टी शिकायलाही मिळाल्या.

 सिनेजगातात ‘हिरो’ म्हणजे एक पब्लिक प्रॉपटी असतो… त्यामुळे स्वत:चा फिटनेस राखणं आणि हॅन्डसम दिसणं अत्यंत आवश्यक समजलं जातं... मी किती छान दिसतो... यावर विशेष करुन काळजी घ्यावी लागते...’ 
या संघर्षानं मला खूप काही शिकायला मिळालं... जीवनात मोकळेपणानं जगणं... स्वत:ला ओळखणं आणि आपल्या अनुभवातून शिकणं खूप गरजेचं आहे’ असंही अर्जुननं म्हटलंय.

अर्जुननं आपल्या रिलेशनशीपबद्द्ल बोलताना आपल्या सध्या कुणालाही डेटिंग करत नसून, अद्याप सिंगल असल्याचंच म्हटलंय.

. मी कोणत्याचं मुलीशी रिलेशनमध्ये नाही अजुन मी सिंगल आहे. असं मत अर्जुनने स्पष्ट केलं आहे.

 इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

 

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.