'विद्या बालन'ला जमलं, ते 'करिना'ला नाही?

'द डर्टी पिक्चर' ने विद्या बालनच्या फिल्मी करियरमध्ये चार चाँद लावले आहेत. मात्र करिना कपूरच्या मते अशा चित्रपटात ती कधीही भूमिका साकारू शकणार नाही. 

Updated: Jun 30, 2014, 08:53 PM IST
'विद्या बालन'ला जमलं, ते 'करिना'ला नाही? title=

मुंबई : 'द डर्टी पिक्चर' ने विद्या बालनच्या फिल्मी करियरमध्ये चार चाँद लावले आहेत. मात्र करिना कपूरच्या मते अशा चित्रपटात ती कधीही भूमिका साकारू शकणार नाही. 

करिनाच्या द डर्टी पिक्चरमधील विद्या बालनच्या भूमिकेविषयी म्हणते, असा बोल्ड सीन करण्याची हिंमत माझ्यात नाही, मला नाही वाटतं असा चित्रपट कधी शकेल.

करिनाने आपल्या करियरच्या सुरूवातीला चमेली चित्रपट केला होता, यात करिनाने सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. यावर करिना म्हणते, तेव्हा मी नवी होती, मला स्वत:ला सिद्ध करायचं होतं, पण मला आता त्याची गरज वाटत नाही.

सध्या करिना कपूर 'सिंघम रिटर्न्स' च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.