'उडता पंजाब'च्या लीक कॉपीमध्ये व्हायरस?

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली उडता पंजाब ही फिल्म अखेर येत्या शुक्रवारी रिलीज होतेय. मात्र प्रदर्शनापूर्वीच सिनेमाची प्रिंट ऑनलाईन लीक झालीये.

Updated: Jun 16, 2016, 09:03 AM IST
'उडता पंजाब'च्या लीक कॉपीमध्ये व्हायरस?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली उडता पंजाब ही फिल्म अखेर येत्या शुक्रवारी रिलीज होतेय. मात्र प्रदर्शनापूर्वीच सिनेमाची प्रिंट ऑनलाईन लीक झालीये.

मात्र या कॉपीमध्ये व्हायरस असल्याची चर्चा होतेय. त्यामुळे चित्रपटाची ही कॉपी डाऊनलोड करु नये अशी विनंती बॉलीवूड कलाकारांकडून केली जातेय.

हा चित्रपट डाऊनलोड केल्यास व्हायरस येण्याची शक्यता असल्याने प्रेक्षकांनी हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहावा. डाऊनलोड करु नये असे आवाहन करण्यात आलेय. 

आधीच सेन्सॉरची कात्री आणि कोर्टाच्या चकरा यात फिल्मचं प्रमोशन करण्यासाठी टीमला फारसा वेळ मिळाला नाही. आता प्रिंट लिकमुळे आणखीनच नवं संकट फिल्मच्या टीमपुढे उभं राहिलंय.