अक्षय असेल तर काम करणार नाही : रणवीर सिंग

बाजीराव मस्तानीच्या सुपरहिट सक्सेसनंतर आणि रणवीरच्या अभिनयावर प्रभावित होऊन करण जोहरने आपल्या पुढच्या चित्रपटात रणवीरला घ्यायचे ठरविले. मात्र रणवीरसोबत अक्षय कुमारही प्रमुख भूमिकेत असणार आहे. त्यामुळे सहकलाकार म्हणून अक्षयसोबत काम करण्यास रणवीरने थेट नकार दिला आहे. 

Updated: Jun 15, 2016, 08:42 PM IST
अक्षय असेल तर काम करणार नाही : रणवीर सिंग title=
छाया सौजन्य : डिट्टो टी.व्ही.

मुंबई : बाजीराव मस्तानीच्या सुपरहिट सक्सेसनंतर आणि रणवीरच्या अभिनयावर प्रभावित होऊन करण जोहरने आपल्या पुढच्या चित्रपटात रणवीरला घ्यायचे ठरविले. मात्र रणवीरसोबत अक्षय कुमारही प्रमुख भूमिकेत असणार आहे. त्यामुळे सहकलाकार म्हणून अक्षयसोबत काम करण्यास रणवीरने थेट नकार दिला आहे.  

काय आहे कारण ?

अक्षय कुमारसारखा मोठा अभिनेता असल्यानंतर आपल्याला प्रभाव पाडणे शक्य होणार नाही असा न्यूनगंड आल्याने रणवीरने हा चित्रपट करण्यास सरळ नकार दिला. 

त्यामुळे रणवीर स्वत: जर प्रमुख भूमिकेत असेल तरच चित्रपट करणार असा त्याचा फंडा असल्याचे दिसत आहे.