'हमशकल्स' पाहण्यापासून ईशानं वडिलांना वाचवलं...

साजिद खान निर्मित 'हमशकल्स' हा सिनेमा किती वाईट आहे, हे सांगणारे अत्यंत वाईट असे जोक्स तुम्हाला सोशल वेबसाईटवर पाहायला मिळाले असतील. पण, या सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्रीनंच हा सिनेमा किती वाईट आहे, हे दाखवून दिलंय.

Updated: Jul 2, 2014, 05:21 PM IST
'हमशकल्स' पाहण्यापासून ईशानं वडिलांना वाचवलं... title=

मुंबई : साजिद खान निर्मित 'हमशकल्स' हा सिनेमा किती वाईट आहे, हे सांगणारे अत्यंत वाईट असे जोक्स तुम्हाला सोशल वेबसाईटवर पाहायला मिळाले असतील. पण, या सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्रीनंच हा सिनेमा किती वाईट आहे, हे दाखवून दिलंय.

'हमशकल्स' या सिनेमात अभिनय करणाऱ्या ईशा गुप्ता हिनं आपल्या वडिलांना हा सिनेमा न पाहण्याचा सल्ला दिलाय. एव्हढंच नाही तर, ईशानं आपल्या कुटुंबीयांना हा सिनेमा न पाहण्याची आणि वडिलांनाही पाहू न देण्याची तंबी दिलीय. आपले वडील हा सिनेमा सहन करू शकणार नाहीत... हा सिनेमा त्यांनी पाहण्यासारखा नाही, असं ईशाला वाटतंय.

जर या सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्रीलाच असं वाटत असेल तर साधारण: दर्शकांची काय बिशाद.... की ते हा सिनेमा पाहायला जातील... आणि जे लोक गेले ते पस्तावत बाहेर पडले. 

साजिद खाननं या सिनेमाच्या यशाची पार्टी दिलीही असेल पण, फॉक्स स्टार स्टुडिओला मात्र यामुळे २० करोड रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय.  

साजिद खाननं लागोपाठ दोन फ्लॉप सिनेमे दिलेत. याआधी साजिदचा 'हिम्मतवाला'ही पडला होता. त्यामुळे साजिदनं मनोरंजन आणि कॉमेडीच्या नावावर फाल्तू सिनेमे प्रेक्षकांच्या माथ्यावर मारणं बंद करण्यातच शहाणपण आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.