टॉपलेस फोटोंवर कृष्णानं दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया...

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शेअर केलेल्या टॉपलेस फोटोंमुळे चर्चेत आलीय. यानंतर कृष्णाही बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याची तयारी करतेय, अशी चर्चा सुरू आहे. याच फोटोंवर कृष्णानं आता प्रतिक्रिया दिलीय.

Updated: Sep 16, 2015, 01:10 PM IST
टॉपलेस फोटोंवर कृष्णानं दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया...

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शेअर केलेल्या टॉपलेस फोटोंमुळे चर्चेत आलीय. यानंतर कृष्णाही बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याची तयारी करतेय, अशी चर्चा सुरू आहे. याच फोटोंवर कृष्णानं आता प्रतिक्रिया दिलीय.

अधिक वाचा - जॅकी श्राफची मुलगी कृष्णाचे टॉपलेस फोटो व्हायरल

आपण हे फोटोशूट केवळ गंमत म्हणून केलं होतं, असं कृष्णानं म्हटलंय. एका बॉलिवूड न्यूज वेबसाईटशी बोलताना कृष्णानं यावर स्पष्टीकरण दिलंय. 

'हे फोटोशूट मी आणि माझ्या मित्रानं माझ्याच बेडरुममध्ये केलं होतं... आणि ते केवळ मस्तीसाठी केलं होतं. माझ्या फोटोग्राफर मित्राला त्याच्या करिअरसाठी पोर्टफोलिओ बनवायचा होता. आम्ही दोघं कॅमेऱ्यासोबत फक्त मस्ती करत होतो... आणि सहज फोटो क्लिक करत होतो. मी माझे काही आवडते फोटो नेहमीच इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करते...' असं कृष्णानं म्हटलंय. 

अधिक वाचा - कृष्णाच्या टॉपलेस फोटोंवर पाहा काय म्हणतोय जॅकी दादा...

सोशल मीडियावर आल्यानंतर हे फोटो लोकांना खूप आवडलेत... त्यामुळे आता ही दोघांसाठीही जिंकणारी स्थिती आहे, असं म्हणतानाच आपल्याला बॉलिवूडमध्ये येण्याची इच्छा कृष्णानं व्यक्त केलीय. 

'मला बॉलिवूडचा भाग बनून आनंदच होईल. ही खूप चांगली इंडस्ट्री आहे... माझ्या कुटुंबाला या इंडस्ट्रीनं खूप काही दिलंय. पण, सध्या मात्र मी अभिनयाकडे करिअर म्हणून पाहात नाही' असं कृष्णानं स्पष्ट केलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.