काबिलचा दुसरा ट्रेलर रिलीज

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनच्या पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या काबिल या सिनेमाचा दुसरा ट्रेलर रिलीज झालाय. नुकतेच या चित्रपटाचे दोन नवे पोस्टर ट्विटरवर शेअर करण्यात आले होते. 

Updated: Dec 20, 2016, 10:24 AM IST
काबिलचा दुसरा ट्रेलर रिलीज title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनच्या पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या काबिल या सिनेमाचा दुसरा ट्रेलर रिलीज झालाय. नुकतेच या चित्रपटाचे दोन नवे पोस्टर ट्विटरवर शेअर करण्यात आले होते. 

संजय गुप्ता यांचे दिग्दर्शन असलेल्या काबिलमध्ये हृतिकसोबत यामी गौतम, रॉनित रॉय, रोहित रॉ़य यांच्याही भूमिका आहेत. ट्रेलरची सुरुवातच हृतिकच्या डायलॉगने होते. ट्रेलरमध्ये हृतिक आणि यामीची चांगली केमिस्ट्री दिसून येते.

राकेश रोशनने यांनी काबिलचा दुसरा ट्रेलर ट्विट केलाय.