'ऐ दिल है मुश्किल' आता नव्या 'मुश्किल'मध्ये

पाकिस्तानी कलाकार फवाद खानच्या भूमिकेमुळे वादात सापडलेला ऐ दिल है मुश्किल हा सिनेमा रुपेरी पडद्यावर रिलीज झाला खरा मात्र या सिनेमाभोवतीचं वादाचं ग्रहण सुटता सुटत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्याबद्दल अपमानास्पद टीपण्णी करणा-या डायलॉगमुळे हा सिनेमा नव्या वादात अडकला आहे.

Updated: Nov 1, 2016, 12:15 PM IST
'ऐ दिल है मुश्किल' आता नव्या 'मुश्किल'मध्ये title=

मुंबई : पाकिस्तानी कलाकार फवाद खानच्या भूमिकेमुळे वादात सापडलेला ऐ दिल है मुश्किल हा सिनेमा रुपेरी पडद्यावर रिलीज झाला खरा मात्र या सिनेमाभोवतीचं वादाचं ग्रहण सुटता सुटत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्याबद्दल अपमानास्पद टीपण्णी करणा-या डायलॉगमुळे हा सिनेमा नव्या वादात अडकला आहे.

सिनेमाच्या एका सीनमध्ये रणबीर आणि अनुष्का यांच्यात संवाद सुरु असतो. त्यावेळी अनुष्काच्या डायलॉगमध्ये रफींचा हा संदर्भ आलाय. मोहम्मद रफी गायचे कमी आणि रडायचे जास्त असा डायलॉग अनुष्काकडून सिनेमातील या सीनमध्ये ऐकायला मिळतो. याच डायलॉगवरुन नव्या वादाची ठिणगी पडली असून रफी कुटुंबीय त्यामुळं दुखावले गेलेत.. या डायलॉगला करण जोहरने परवानगी दिलीच कशी असा संतप्त सवाल रफी यांचे पुत्र शाहिद रफी यांनी विचारला आहे.