करण जोहर माझ्या मुलीचा गॉडफादर - गौरी खान

करण जोहर हा आपली मुलगी सुहानाचा गॉडफादर आहे, असे शाहरुख खानची पत्नी गौरीने म्हटले आहे. सोशल मीडियावर एक पोस्टमध्ये तिने याबाबत भाष्य केले आहे.

Updated: Feb 20, 2016, 11:33 PM IST
करण जोहर माझ्या मुलीचा गॉडफादर - गौरी खान

मुंबई : करण जोहर हा आपली मुलगी सुहानाचा गॉडफादर आहे, असे शाहरुख खानची पत्नी गौरीने म्हटले आहे. सोशल मीडियावर एक पोस्टमध्ये तिने याबाबत भाष्य केले आहे.

इन्स्टाग्रामवर गौरीने एक पोस्ट केली आहे, त्यात सुहाना आणि करण जोहरचा फोटो खाली कॅप्शनमध्ये, करण जोहर हा सुहानाचा गॉडफादर असल्याचे लिहिले आहे. 

करण जोहरने आजपर्यंत अनेक स्टार किडसना संधी दिली आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन खानही त्याच्या लिस्टमध्ये असल्याचे सांगण्यात येते. हा फोटो मुंबई एअरपोर्ट बाहेरचा आहे. करण जोहर सुहानाला बॉलिवूडमध्ये प्रवेश देणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.