मलाईका-अर्जुनच्या अफेअरवर करन जोहरचं शिक्कामोर्तब?

अभिनेत्री मलाईका अरोरा खान आणि अरबाझ खान यांनी एकमेकांपासून आता वेगळे होत असल्याचं जाहीर केलंय. पण, यामागचं कारणावर मात्र दोघांनीही गप्प राहणंच पसंत केलंय. 

Updated: May 17, 2016, 02:21 PM IST
मलाईका-अर्जुनच्या अफेअरवर करन जोहरचं शिक्कामोर्तब?

मुंबई : अभिनेत्री मलाईका अरोरा खान आणि अरबाझ खान यांनी एकमेकांपासून आता वेगळे होत असल्याचं जाहीर केलंय. पण, यामागचं कारणावर मात्र दोघांनीही गप्प राहणंच पसंत केलंय. 

गेल्या अनेक दिवसांपासून 'मै तो सलमान का फॅन' असं म्हणणारा अभिनेता अर्जुन कपूर आणि मलाईका यांच्या अफेअरच्या बातम्याही मीडियातून समोर येतायत... यावरच जणू काही करन जोहरनं शिक्कामोर्तब केलंय.

filmymonkey.com या वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, 'यंग लडकों के पिछे भागना बंद कर दो मलाईका' असा टोमणा मलाईकाला एका डान्स रिअॅलिटी शोच्या स्टेजवर मारलाय. 

'इंडियाज गॉट टॅलन्ट' या कार्यक्रमात जज म्हणून करन जोहर, मलाईका अरोर आणि किरण खेर एकत्र दिसत आहेत. याच कार्यक्रमा दरम्यान हा किस्सा घडल्याचं सांगण्यात येतंय. 

आता, करननं हा टोमणा मलाईकाला अर्जुनवरून मारला की सहजच, ते दोघंच सांगू शकतील... मात्र, यामुळे अर्जुन - मलाईकाची प्रेमकहाणी बी टाऊनमध्ये पुन्हा एकदा चर्चेत आलीय.