'फितूर'साठी कतरिना-आदित्यचं मानधन किती? जाणून घ्या...

आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ यांचा 'फितूर' प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झालाय. पण, या सिनेमासाठी या दोघांना किती बरं मानधन मिळालं असेल? कुणाला जास्त मानधन मिळालं असेल? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल... तर हे घ्या उत्तर.. 

Updated: Feb 6, 2016, 07:13 PM IST
'फितूर'साठी कतरिना-आदित्यचं मानधन किती? जाणून घ्या... title=

नवी दिल्ली : आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ यांचा 'फितूर' प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झालाय. पण, या सिनेमासाठी या दोघांना किती बरं मानधन मिळालं असेल? कुणाला जास्त मानधन मिळालं असेल? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल... तर हे घ्या उत्तर.. 

या सिनेमासाठी कतरिना आणि आदित्य दोघांनाही सारखंच मानधन मिळालंय. त्यामुळे, हिरोपेक्षा हिरोइन्सला कमी मानधन मिळतं, हे वाक्य या सिनेमासाठी तरी लागू होणार नाही.

'फितूर'साठी कतरिना आणि आदित्य या दोघांना प्रत्येकी ४ करोड रुपये मानधन देण्यात आलंय. 'बॉलिवूड लाईफ'मध्ये ही माहिती देण्यात आलीय. 

परंतु, कतरिना ही आदित्यपेक्षा सीनिअर अभिनेत्री असतानाही तिला आदित्य एव्हढंच मानधन देण्यावरही अनेकांनी आक्षेप नोंदवलाय. आदित्य केवळ प्रोड्युसर सिद्धार्थ रॉय कपूरचा भाऊ आहे म्हणून त्याला एव्हढं मानधन मिळतंय, असंही म्हटलं जातंय.