'मादाम तुसा'मध्ये कतरिनाचाही मेणाचा पुतळा

अनेक भारतीय तरुणांच्या ह्रदयात स्थान मिळवलेली बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफ हिनं आता लंडनच्या मादाम तुसा संग्रहालयात आपलं स्थान निश्चित केलंय. लंडनच्या मदाम तुसा म्यूझिअममध्ये कतरिनाचा मेणाचा पुतळा प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलाय. 

Updated: Mar 29, 2015, 12:04 AM IST
'मादाम तुसा'मध्ये कतरिनाचाही मेणाचा पुतळा title=

मुंबई : अनेक भारतीय तरुणांच्या ह्रदयात स्थान मिळवलेली बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफ हिनं आता लंडनच्या मादाम तुसा संग्रहालयात आपलं स्थान निश्चित केलंय. लंडनच्या मदाम तुसा म्यूझिअममध्ये कतरिनाचा मेणाचा पुतळा प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलाय. 

या पुतळ्यात कतरिना डान्सिंग पोजमध्ये दिसत आहेत. 'शीला की जवानी' या तिच्या गाण्यातील लूकचा पुतळा येथे साकारण्यात आला आहे. सिल्व्हर आणि पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये उभ्या असलेल्या स्वत:च्या पुतळ्या समोर जाताच, हा पुतळा हुबेहुब माझ्यासारखाचं दिसतोय, अशी प्रतिक्रिया कतरिनाने दिलीय.

या पूर्वीसुद्धा मादाम तुसा म्युझिअममध्ये बॉलिवूडच्या काही कलाकारांचे पुतळे उभे करण्यात आले आहेत.  यामध्ये महानायक अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, करीना कपूर आणि माधुरी दीक्षित यांचा समावेश आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.