तब्बल एक कोटी लोकांनी पाहिला 'क्या कूल हैं हम 3'चा ट्रेलर

आगामी 'क्या कूल हैं हम 3' या चित्रपटाचा ट्रेलर पाहणाऱ्यांची संख्या तब्बल एक कोटीहून अधिक झालीये. यूट्यूबवर या ट्रेलरला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. 

Updated: Dec 28, 2015, 09:47 AM IST
तब्बल एक कोटी लोकांनी पाहिला 'क्या कूल हैं हम 3'चा ट्रेलर title=

मुंबई : आगामी 'क्या कूल हैं हम 3' या चित्रपटाचा ट्रेलर पाहणाऱ्यांची संख्या तब्बल एक कोटीहून अधिक झालीये. यूट्यूबवर या ट्रेलरला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. 

चाहत्यांनी दाखवलेल्या या प्रेमाबद्दल आफताब शिवदासानी यांनी चाहत्यांचे ट्विटरवरुन आभार मानलेत. एक कोटी व्ह्यू. चाहत्यांच्या या प्रेमाबद्दल धन्यवाद. २२ जानेवारी २०१६साठी तयार राहा, असं त्यांनी ट्विटरवर म्हटलंय.

या चित्रपटातील अभिनेता तुषार कपूरनेही चाहत्यांचे आभार मानलेत. तुषारचे 'क्या कूल हैं हम 3' आणि 'मस्तीजादे' हे चित्रपट एकापाठोपाठ एक प्रदर्शित होतायत. त्यानेही चाहत्यांच्या प्रतिसादाबद्दल ट्विटरवरुन आभार मानलेत.

एकता कपूरची निर्मिती असलेला 'क्या कूल हैं हम 3'चे दिग्दर्शन उमेश घड़गे यांनी केले. हा चित्रपट पुढील वर्षी २२ जानेवारीला प्रदर्शित होतोय.