मुंबई : ब्रेकअपचा सीझन काही वेळ सुरू राहिल्यानंतर बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सीझनच सुरू झालाय. बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्या विवाहाच्या बातमीनंतर थोड्याच वेळात मराठमोळी बॉलिवूडची 'छम्मा... छम्मा' गर्ल उर्मिला मातोंडकर हिच्या विवाहाची बातमी आली... आणि तिच्या अनेक चाहत्यांना अक्षरश: धक्का बसला.
९० च्या दशक गाजवणाऱ्या ऊर्मिलानं वयाच्या ४२ व्या वर्षी मोहसीन अख्तर मीर याच्याशी कुणालाही फारशी भनक लागू न देता विवाह केला. गुरुवारी हा विवाहसोहळा पार पडला.
यानंतर दिलेल्या एका स्टेटमेन्टमध्ये उर्मिलानं, काही मोजक्याच कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडल्याचं जाहीर केलं.