'सैराट'मधील छोट्या 'तात्या'कडून शेवटचा सीन कसा करुन घेतला हे जाणून घ्या!

 'सैराट' सिनेमा सगळ्यांनाच भावलाय. या सिनेमातील शेवट अंगावर काटा उभा करतो. छोटा 'तात्या' नावाचे चिमुकले पात्र आपल्याला रडण्याने अगदी सून्न करते. 

Updated: May 12, 2016, 06:26 PM IST
'सैराट'मधील छोट्या 'तात्या'कडून शेवटचा सीन कसा करुन घेतला हे जाणून घ्या!   title=

मुंबई : नागराच मंजुळे यांचा 'सैराट' सिनेमा सगळ्यांनाच भावलाय. या सिनेमातील शेवट अंगावर काटा उभा करतो. छोटा 'तात्या' नावाचे चिमुकले पात्र आपल्याला रडण्याने अगदी सून्न करते. मात्र, ही व्यक्तिरेखा निभावणाऱ्या या चिमुकल्याकडून कसे काम करुन घेतले असेल, असा प्रश्न तुमच्या मनात असेलच.

नवखे चेहरे हीच खासियत

पिस्तुल्या, फॅंड्री आणि आता सैराट असे एकापेक्षा एक मराठीत सिनेमा दिलेत. या सिनेमात नवखे कलाकार घेऊन भल्या भल्याना टक्कर देणारे चेहरे अर्थात ग्रामीण भागातील खरे हिरो पुढे आणले. तसेच सिनेमाचे शूटिंग कोणत्याही मोठ्या स्टुडिओत न करता मोकळ्या रानात आणि गावातच केले. हिच नागराज यांच्या दिग्दर्शनाची खरी ताकद दिसून येते. तेच तेच विषय न घेता ग्रामीण मागासलेलापणा, जातीपातीची समाज व्यवस्था यावर प्रकाश टाकला. याला लोकांची पसंती मिळत आहे. त्याच्या सिनेमातील कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार मिळल्याने त्याची पोचपावतीही मिळाली.

रडण्याचा अभिनय करुनच घेतला नाही!

आता तर 'सैराट'मधील लहान मुलगा 'छोट्या तात्या'चे काम कसे करुन घेतले, याचीच चर्चा सध्या सुरु आहे. याचे सत्य आम्ही तुम्हाला सांगत आहे तेही नागराज मंजुळे यांनी उघड केलेय. आम्ही सिनेमा केला. मात्र, शेवट करण्यासाठी मोठी कसोटी होती. त्यासाठी लहान मुलाचा शोध सुरु होता. हा सीन कसा करायचा हा प्रश्न होता. मुलगा मिळाला. मात्र, त्याच्याकडून अभिनय करुन घेणे मोठे आव्हान होते. डोक्यात विचार सुरु होते. दु:खाचा डोंगर कोसळला असताना मुलाने रडणे आवश्यक होते. त्याचे आई-बाबा त्याच्यापासून लांब गेले होते. मात्र, लहान मुलाला कसे रडवायचे? या विचार सुरु झाला. मुलाची आवड निवड पाहण्यात आली. त्याला खेळण्यातील गाड्या आवडायच्या. त्याच्या हातातून गाडी काढून घेतली तर तो रडतो. त्यानंतर सीन ओके केल्यानंतर त्याला खेळण्यासाठी गाडी दिली. ओके केलेल्या सीनच्यावेळी ती गाडी काढून घेतली. (त्याच मुलाच्या खऱ्या आईने त्याच्या हातातील गाडी काढून घेतली.) ती घेण्यासाठी  त्या लहान मुलाने रडणे सुरु केले आणि इथंच शॉट ओके झाला.