अब्बास-मस्तानचा हा सिनेमा ठरला बॉलीवूडमधील सर्वात फ्लॉप

बॉलीवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे करणाऱ्या अब्बास-मस्तान यांचा मशीन हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटलाय. आतापर्यंतचा हा बॉलीवूडमधील सर्वात फ्लॉप सिनेमा असू शकतो. 

Updated: Mar 26, 2017, 05:48 PM IST
अब्बास-मस्तानचा हा सिनेमा ठरला बॉलीवूडमधील सर्वात फ्लॉप

नवी दिल्ली : बॉलीवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे करणाऱ्या अब्बास-मस्तान यांचा मशीन हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटलाय. आतापर्यंतचा हा बॉलीवूडमधील सर्वात फ्लॉप सिनेमा असू शकतो. 

अब्बाज-मस्तान यांनी बॉलीवूडमध्ये बाजीगर, 'अजनबी', 'ऐतराज', 'हमराज', 'बादशाह', 'रेस' आणि 'रेस 2' असे हिट सिनेमे दिलेत. त्यामुळे हा सिनेमा इतका फ्लॉप ठरेल असा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता.

या सिनेमाद्वारे अब्बाज-मस्तान यांचा मुलगा मुस्तफा याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. मात्र या सिनेमाला प्रेक्षकांनी साफ नाकारलेय. हा सिनेमा १७ मार्चला रिलीज झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या जुहूमधील एका पीव्हीआरमध्ये तर हा सिनेमा पाहण्यासाठी केवळ एकच प्रेक्षक उपस्थित होता. त्यामुळे हा शो कॅन्सल करण्यात आला. १७ मार्चला रिलीज झाल्यानंतर या सिनेमाने आतापर्यंत केवळ २ कोटींची कमाई केलीये.