प्रियंका चोप्राची बहिण मन्नाराच्या 'जिद' बोल्ड सिनेमाचा ट्रेलर व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिची बहिण मन्नारा तथा बार्बी हांडा हिच्या नव्या 'जिद' या सिनेमाची चर्चा आहे ती बोल्ड दृश्यांमुळे. या सिनेमाचा ट्रेलर व्हायरल झालाय. या ट्रेलरची युट्युबवर धूम आहे. आतापर्यंत २० लाखांपेक्षा जास्त लोकांनी त्याला पसंती दिली आहे.

Updated: Nov 4, 2014, 01:54 PM IST
प्रियंका चोप्राची बहिण मन्नाराच्या 'जिद' बोल्ड सिनेमाचा ट्रेलर  व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिची बहिण मन्नारा तथा बार्बी हांडा हिच्या नव्या 'जिद' या सिनेमाची चर्चा आहे ती बोल्ड दृश्यांमुळे. या सिनेमाचा ट्रेलर व्हायरल झालाय. या ट्रेलरची युट्युबवर धूम आहे. आतापर्यंत २० लाखांपेक्षा जास्त लोकांनी त्याला पसंती दिली आहे.

पोस्टरवर मन्नारा टॉपलेस दिसत आहे. तसेच या सिनेमाचा ट्रेलरही हॉट आहे.  'जिद' हा एक एरॉटिक थ्रिलर सिनेमा आहे. एका मुलाखतीत मन्नाराने सांगितले, माझ्याकडे हॉट बॉडी आहे. ती दाखविण्यास मला काहीही वाटत नाही. (मेरे पास हॉट बॉडी है और मुझे अपनी बॉडी दिखाने में कोई परहेज़ नहीं है)

आपल्याला माहित असेल, बॉलिवूडमध्ये आल्यानंतर बार्बी हांडाने अपना आपले नाव बदलले. तिने मन्नारा असं नाव ठेवलं.  बार्बीने हे नविन नाव फिल्म प्रोड्यूसर अनुभव सिन्हा याच्या सल्याने ठेवले आहे. माधुरी दीक्षित हिचे अनेक फॅन्स आहेत. ती माधुरीची चाहती आहे. त्यामुळे तिने आपले नाव 'म' अक्षराने ठेवले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.