फसवणूक : गायक सुरेश वाडकर यांच्यासह चौघांवर गुन्हा

 खोट्या करारनाम्याच्या वापर करून शासकीय महसुलात नोंद आणि कागदपत्रांचा गैरवापर करून  फसवणूक केल्याप्रकरणी गायक सुरेश वाडकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्याचे  आदेश  नाशिक न्यायालयाने उपनगर पोलिसांना दिले आहेत.  

Updated: Nov 4, 2014, 11:02 AM IST
फसवणूक : गायक सुरेश वाडकर यांच्यासह चौघांवर गुन्हा title=

नाशिक : खोट्या करारनाम्याच्या वापर करून शासकीय महसुलात नोंद आणि कागदपत्रांचा गैरवापर करून  फसवणूक केल्याप्रकरणी गायक सुरेश वाडकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्याचे  आदेश  नाशिक न्यायालयाने उपनगर पोलिसांना दिले आहेत.  

अशाच पद्धतीने फसवणूकीच्या प्रकारात भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी वाडकर यांच्यासह काही आरोपींवर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात वाडकर यांचे सहकारी हेमंत  कोठीकर  यांनी फिर्याद दिली होती. याच प्रकरणातील फसविले गेलेल्या मुकुंद गोविंद कोकीळ यांनीही उपनगर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीसंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. यात निकाल देताना सुरेश वाडकर यांच्यासह विनायक विष्णू धोपावकर, विजया निळकंठ करंदीकर आणि विष्णू रामचंद्र शिंदे यांच्यावरही गुन्हा दाखल करावा असे आदेश देण्यात आले आहेत.

या व्यवहारत फसवणूक झाल्याने सुरेश वाडकर यांनी निबंधक कार्यालय जिल्हा महसूल प्रशासनाचे संगनमत असल्याचे आरोप केले होते. यापूर्वीच्या पोलीस  कारवाईत  वाडकर यांनी अटकपूर्व जामीन मिळविला होता. आता पुन्हा दुसरा गुन्हा दाखल होत असल्याने वाडकर यांच्यामागे पोलिसांचा ससेमिरा सुरु होणार आहे. नाशिकमध्ये जमिनीना आलेला सोन्याचे भाव आणि मुंबई पुण्याच्या गुंतवणुकदारांना बनावट कागदपत्रे करून फसविण्याचे उद्योग सऱ्हास सुरु आहेत. अशा लाखो तक्रारी येत असताना शासन मात्र याकडे डोळेझाक करत आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.