मुंबई: अभिनेता मनोज वाजपेयी मुंबईच्या रस्त्यांवर ट्रॅफिक पोलिसांचा ड्रेस घालून पाहायला मिळाला. यावेळी मनोजनं मुंबईकरांची लायसनही चेक केली. आपला आगामी चित्रपट ट्रॅफिकसाठी मनोजनं हे आगळं वेगळं प्रमोशन केलं.
ट्रॅफिक हा चित्रपट मुंबईतल्या ट्रॅफिक हवालदाराच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये मनोज वाजपेयी ट्रॅफिक पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. 6 मे ला हा चित्रपट रिलीज होणार आहे.
मुंबईच्या जुहू परिसरामध्ये ट्रॅफिक पोलिसांबरोबर मनोजनं काही वेळ घालवला. या चित्रपटामध्ये मनोजबरोबर जिमी शेरगिल, दिव्या दत्ता आणि सचिन खेडेकर यांनीही काम केलं आहे.