मराठी कलाकारांनी घेतला शोभा डेंचा समाचार

प्राईम टाईममध्ये मराठी सिनेमे दाखवण्याबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाचा लेखिका शोभा डे यांनी केलेल्या विरोधाला मराठी कलाकारांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

Updated: Apr 11, 2015, 02:49 PM IST
मराठी कलाकारांनी घेतला शोभा डेंचा समाचार

मुंबई : प्राईम टाईममध्ये मराठी सिनेमे दाखवण्याबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाचा लेखिका शोभा डे यांनी केलेल्या विरोधाला मराठी कलाकारांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

मराठी कलाकारांनी या निर्णयाचे स्वागत करत शोभा डे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.  दिग्दर्शक रवी जाधव यांनी तर कोण आहेत या शोभा डे, मला शोभायात्रा माहीत आहेत, शोभा दिवस नाही, असे सांगत त्यांची खिल्ली उडवली आहे. 
पुष्कर जोगनेही शोभा डे यांना काय वाटतं याची काळजी करायची गरज नसल्याची भावना व्यक्त केली आहे.

आदिनाथ कोठारे याने सांगितले की, मराठी सिनेमांबद्दल अभ्यास करून शोभा डे यांनी प्रतिक्रिया द्यायला हवी होती.

सरकारने आता प्राईम टाईमची जरी व्याख्या बदलली असली तरी, मराठी कलाकारांनी शोभा डे यांनी केलेल्या वक्तव्याची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.