मीराला शाहिदशी लग्न करायचंच नव्हतं, पण...

अभिनेता शाहिद कपूर आणि दिल्लीस्थित मीरा यांचा आज (मंगळवारी) विवाह पार पडतोय. पण, मीराला शाहिदशी लग्न करायचंच नव्हतं, अशी गोष्ट समोर येतेय.

Updated: Jul 7, 2015, 11:36 AM IST
मीराला शाहिदशी लग्न करायचंच नव्हतं, पण...

नवी दिल्ली : अभिनेता शाहिद कपूर आणि दिल्लीस्थित मीरा यांचा आज (मंगळवारी) विवाह पार पडतोय. पण, मीराला शाहिदशी लग्न करायचंच नव्हतं, अशी गोष्ट समोर येतेय.

मीरा शाहिदसोबत विवाहबद्ध होण्यासाठी अगोदरपासूनच साशंक होती. याचं मुख्य कारण होतं या दोघांच्या वयातील फरक... शाहिदनं सध्या वयाची ३४ वर्ष पूर्ण केलीत. तर मीरानं अवघी २० वर्ष...

त्यामुळेच, मीराला आपल्या या विवाहाविषयी शंका वाटत होती. एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, या बॉलिवूड स्टारसोबत विवाहासाठी मीरा अगोदर तयारच नव्हती. लग्नाची चर्चा जसजशी पुढे जात होती तसतशी मीराचीही धाकधूक वाढत होती. 

पण, मग यामध्ये मीराच्या मोठ्या बहिणीनं हस्तक्षेप केला आणि तिनंच मीराचं मन वळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सोबतच, क्यूट शाहिदनं मीराला कन्व्हेन्स करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला... त्याच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि अखेर मीरा लग्नासाठी तयार झाली. 

चला... आता तर सगळं सुरळीत झालंय.... दोघं बोहल्यावर चढण्यासाठी तयारही झालेत. आपणही या दोघांना शुभेच्छा देऊयात...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.