close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

प्रशांत दामलेंकडून बदनामीचं राजकारण-मनसे

नाशिकच्या कालीदास नाट्यगृहाच्या दुरावस्थेचे फोटो अभिनेते प्रशांत दामलेंनी फेसबूकवर शेअर केले होते.

Updated: Jan 19, 2017, 08:54 PM IST
प्रशांत दामलेंकडून बदनामीचं राजकारण-मनसे

मुंबई : नाशिकच्या कालीदास नाट्यगृहाच्या दुरावस्थेचे फोटो अभिनेते प्रशांत दामलेंनी फेसबूकवर शेअर केले होते. यानंतर आता नाशिक महापालिकेमध्ये सत्ता असलेल्या मनसेनं प्रशांत दामलेंवर आरोप केले आहेत.

प्रशांत दामलेंना राज्यातील अन्य नाट्यगृहांची दुरावस्था मांडाविशी वाटली नाही का? ते नाट्यनिर्माता संघाचे अध्यक्ष होते तेव्हा नाट्यगृहांच्या दुरावस्थेबाबत काही बोलले का? असे सवाल मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी उपस्थित केले आहेत. हे मनसेला बदनाम करण्याचं राजाकरण असल्याचंही खोपकर म्हणाले आहेत.

नाट्यगृहाचा आराखडा मंजूर झाला आहे, पण आचारसंहिता घोषित झाल्यामुळे त्याचं काम थांबलं आहे. गेली तीन वर्ष नाशिक महापालिकेला आयुक्त नसल्यामुळे काम रखडल्याचं स्पष्टीकरणही अमेय खोपकर यांनी दिलं आहे.