मुंबई: अभिनेत्री शिखा जोशी आत्महत्या प्रकरणात मुंबईतील वर्सोवा पोलिसांनी सोमवारी रात्री उशीरा दोन मॉडेल्सचा जबाब नोंदवून घेतलाय. मॉडेल मधू भारती आणि अनु या त्या दोन मॉडेल्स आहेत.
शिखाचा मृत्यू झाला तेव्हा या दोघी तिथं उपस्थित होता. मधू भारतीनं त्यावेळी शिखाचा एक व्हिडिओही तयार केला. ज्यात शिखा आपल्या आत्महत्येच्या कारणाची माहिती देतेय.
सोमवारी रात्री 9 वाजता मधू आणि अनु वर्सोवा पोलीस स्टेशनला पोहोचल्या. जिथं तब्बल 4 तास त्यांची चौकशी केली केली आणि त्यांचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला.
पोलीस या प्रकरणात मुंबईतील एका मोठ्या डॉक्टरची चौकशी करण्याची शक्यता आहे. शिखानं व्हिडिओमध्ये या डॉक्टरचं नाव घेतलं होतं आणि एका विवाहित पुरूषाचा उल्लेख केला होता.
मधूनं शिखाचा काढलेला व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.