सिनेमा : किल दिल
दिग्दर्शक : शहाद अली
कलाकार : गोविंदा, रणवीर सिंह, परिणीति चोप्रा, अली जाफर
वेळ : 127 मिनिट
मुंबई : बॉलिवूडच्या मसाला मुव्हींमध्ये खूप वेळाने खरा उतरला तो चित्रपट म्हणजे ‘किल दिल’. खास बाब म्हणजे गोविंदाने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाचा ठसा लोकांच्या मनावर उमटवलाय तर रणवीर सिंग आणि अली जाफर या जोडीने पडद्यावर चांगलीच धमाल केलीये. अभिनेत्री परिणिती चोप्रा संपूर्ण मुव्हीमध्ये खूप आकर्षक वाटते.
सिनेमाचं ढोबळ कथानक...
‘किल दिल’ सिनेमाचं कथानक चालू होतं ते म्हणजे एका टिपिकल बॉलिवूड सिनेमासारखं. रणवीर सिंग आणि अली जाफर हे दोघेही लहानपणीचे घनिष्ठ मित्र असतात. लहानपणापासूनच त्यांचा सांभाळ त्यांचा भाऊ गोविंदाने केलेला असतो. गोविंदाला ते दोघेही कचऱ्यापेटीत भेटतात तेव्हापासून तो त्यांचा भाऊ बनून राहतो. त्या दोघांनाही तो किलर्स बनवतो. दोघेही एकमेकांसाठी जीव देण्यास देखील तयार असतात. सिनेमा इथवर साध्या रुपात असतो, परंतु, जेव्हा अभिनेत्री परिणिती चोप्राची एंट्री होते तेव्हा मात्र सिनेमा वेगळेच वळण घेतो. रणवीर आणि परिणितीचं प्रेम जुळतं परंतु त्यांचं प्रेम हे गोविंदाला मान्य नसतं. तो त्याला किल या दिल पैकी एकाची निवड करायला लावतो. तो कोणाची निवड करतो हे कळण्यासाठी तुम्हाला सिनेमा पहावा लागेल.
अभिनय
सिनेमांत गोविंदाचा अभिनय प्रेक्षकांना अजून बहरलेला असता तर आणखी आवडला असता. रणवीर सिंगचा अभिनय लोकांना खूपच भावला. अली जाफरचा कॉमेडी रोल कौतुकास्पद आहे. परंतु परिणिती चोप्राचा अभिनय प्रेक्षकांना फारसा काही रुचला नाही.
कसा आहे सिनेमा...
सिनेमाचा फर्स्ट हाफ तुम्हाल थोडा स्लो वाटू शकतो. पण, इंटरवलनंतर मात्र सिनेमाचा जम चांगला बसलाय. किल आणि दिलचा मामला बघण्यासारखा आहे.
शेवटी काय तर...
मनोरंजनासाठी हा सिनेमा एक मेजवानी ठरु शकतो.
संगीत गाणी
या चित्रपटाचे गीतकार गुलजार आहेत. पण त्यांची छाप या चित्रपटावर पडलेली दिसत नाही. ‘दिल से’ ‘साथीया’ ‘माचिस’ या सारख्या चित्रपटांची गाणे लिहणारे गुलजार या चित्रपटात आपली कमाल दाखवू शकले नाही, असेच वाटते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.