मुंबई : पत्नी सुझान रोशन हिच्याशी घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता ऋतिक रोशनबद्दल वेगवेगळ्या अफवांना ऊत आलाय... तो कोणत्याही मुलीला भेटला की लगेचच चर्चा सुरू होते... अशाच चर्चा आणि अफवांना पेव फुटला जेव्हा मुंबईत पार पडलेल्या एका फिल्म स्क्रिनिंगच्या वेळी ऋतिक रोबत एक अनोळखी मुलगी दिसली...
लगेचच, चर्चा सुरू झाली.. ती मुलगी ऋतिकची फॅन आहे की त्याची कुणी मैत्रीण... पण, याचंही उत्तर लवकरच मिळालं...
ही मुलगी दुसरी-तिसरी कुणीही नसून ऋतिकचा मित्र आरफीन खान याची पत्नी होती. आरफीन सध्या एक न्यूरो परफॉर्मन्स प्रोग्रामिंग एक्सपर्ट आणि मोटिवेशनल स्पीकर आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी ऋतिक स्क्रिनिंगनंतर एका मल्टिप्लेक्समधून बाहेर निघाला तेव्हा ही मुलगी त्याच्या सोबत होती. दोघांनी एकमेकांची गळाभेटही घेतली... त्यामुळे लगेचच चर्चा सुरू झाल्या होत्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.