मुंबई: काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर येणाऱ्या मोगली या मालिकेनं प्रचंड लोकप्रियता कमावली होती. हाच मोगली आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. जंगल बूक असं या चित्रपटाचं नाव आहे.
8 एप्रिलला हा चित्रपट भारतामध्ये रिलीज होणार आहे. हिंदीमध्येही हा चित्रपट डब करण्यात आला आहे. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या मोगली मालिकेतल्या शेर खानला नाना पाटेकर यांनी आपला आवाज दिला होता. आता चित्रपटामध्येही नानानींच शेर खानला आवाज दिला आहे.
नाना बरोबरच प्रियांका चोप्रा, इरफान खान, ओम पुरी यांनीही या चित्रपटाच्या हिंदी डबिंगला आवाज दिला आहे. प्रियांकानं 'का' या अजगराच्या पात्राला, इरफाननं अस्वल असलेल्या 'बल्लू'ला तर ओम पुरींनी 'बगीरा' या काळ्या चित्त्याला आवाज दिला आहे.