मुंबई : अभिषेक बच्चन आता बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा पती असला तरी याआधी अभिषेकच्या जीवनात एक दुसरी अभिनेत्री होती. अभिषेकचं पहिलं प्रेम हे करिश्मा कपूर होती. यांची लव्ह स्टोरी अनेकांना माहित होती. दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. पण त्यांचं लग्न होऊ शकलं नाही.
करिश्मा-अभिषेक एकमेकांना लहानपणांपासून ओळखत होते. अभिषेकची बहिण श्वेताच्या लग्नानंतर यांच्यात जवळीकता वाढली. श्वेताचं लग्न करिश्माच्या अत्याच्या मुलासोबत झालं आहे. दोघांच्या लव्ह स्टोरीचा या दोघांनी कधीच उल्लेख केला नाही. अभिषेकचा सिनेमा रेफ्यूजी यादरम्यानच रिलीज झाला. या सिनेमात करिश्माची बहिण करिना कपूर होती.
करीना सेटवर अभिषेकला जीजू म्हणत होती असं देखील म्हटलं जातं. करिश्मा नेहमी सेटवर यायची. अमिताभ यांनी 60व्या वाढदिवशी या दोघांच्या साखरपुड्याची घोषणा केली. पण त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. असं म्हटलं जातं की करिश्माची आई बबीता यांना अभिषेक पसंद नव्हता.
अभिषेकचे सिनेमे त्या वेळेस फ्सॉप ठरत होते. करिश्मा त्यावेळेस एक सुपरहिट अभिनेत्री होती. करिश्माच्या आईला अशी भीती होती की अभिषेक जर फ्लॉप ठरला तर काय होईल. करिश्माने देखील आईच्या निर्णयापुढे झुकत हा संबंध मोडला. यानंतर दोन्ही परिवारात वाद देखील झाला. त्यानंतर करिश्माने अचानक दिल्लीमध्ये उद्योगपती संजय कपूरसोबत विवाह केला आणि या लव्हस्टोरीचा अंत झाला.