‘कबाली’सिनेमा प्रमोशनवेळी राधिका आपटे का होती गायब ?

मराठी अभिनेत्री राधिका आपटे ही ‘कबाली’या सिनेमा प्रमोशनवेळी उपस्थित न राहिल्याने चर्चा सुरु होती. मात्र, या चर्चेला राधिकाने पूर्णविराम दिलाय. मला वेळ नव्हता. याचे मला वाईट वाटत असल्याचे तिने सांगितले.

Updated: Jul 30, 2016, 06:09 PM IST
‘कबाली’सिनेमा प्रमोशनवेळी राधिका आपटे का होती गायब ? title=
छाया : DNA

मुंबई : मराठी अभिनेत्री राधिका आपटे ही ‘कबाली’या सिनेमा प्रमोशनवेळी उपस्थित न राहिल्याने चर्चा सुरु होती. मात्र, या चर्चेला राधिकाने पूर्णविराम दिलाय. मला वेळ नव्हता. याचे मला वाईट वाटत असल्याचे तिने सांगितले.

कबाली सिनेमात रजनीकांत यांच्या पत्नीची भूमिका साकारणारी राधिका ही तिच्या आगामी सिनेमाच्या कामात सध्या व्यस्त आहे. यामुळेच ती ‘कबाली’च्या प्रमोशनला उपस्थित राहू शकली नाही, असे राधिकाचे म्हणणे आहे. 

वोग ब्युटी अवॉर्डसला राधिकाने उपस्थिती लावली होती. त्यावेळी तिला तू ‘कबाली’च्या प्रमोशनपासून का दूर होतीस, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने हे स्पष्टीकरण दिलेय. मला माहीत आहे आणि मला याच वाईटही वाटत आहे. मी सध्या ‘घौल’ सिनेमाचे शूटिंग करत आहे. त्याच्यामुळेच माझं शेड्यूल व्यस्त असल्याने माझ्याकडे प्रमोशनसाठी वेळ नव्हता. रजनीकांत यांच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव खूपचं छान होता. माझ्या आयुष्यातील सर्वात चांगल्या अनुभवांपैकी हा एक होता.

 रजनीकांत यांच्या ‘कबाली’ने  आतापर्यंत ४०० कोटींचा गल्ला जमविला आहे.  
‘कबाली’ने आतापर्यंत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.  या सिनेमाच्या पहिल्या तीन दिवसांच्या शोच्या सर्व तिकीटांची विक्री प्रदर्शनापूर्वीच झाली होती.