प्रियंका चोपडा भेटली 'द रॉक' स्टारला

अमेरिकन टीव्ही शो क्वान्टीकोमधून लोकप्रिय झालेली प्रियंका चोप्रा आता बे वॉच चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.  १९९० च्या दशकातील लोकप्रिय टीव्ही शो बे वॉचच्या कथेवर हा चित्रपट आधारित असणार आहे.

Updated: Feb 17, 2016, 06:16 PM IST
प्रियंका चोपडा भेटली 'द रॉक' स्टारला title=

लॉस एँजेलस : अमेरिकन टीव्ही शो क्वान्टीकोमधून लोकप्रिय झालेली प्रियंका चोप्रा आता बे वॉच चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.  १९९० च्या दशकातील लोकप्रिय टीव्ही शो बे वॉचच्या कथेवर हा चित्रपट आधारित असणार आहे.

या चित्रपटातील नायक आणि हॉलिवूडचा लोकप्रिय हिरो ड्वेन द रॉक जॉनसनने तिचे कौतुक केले आहे. '' ती एक जगातील मोठी कलाकार आहे. प्रियंका चोप्रा. वेलकम टू बे वॉच' असे म्हणणारा एक व्हिडिओ रॉकने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

चित्रपटात प्रियंका खलनायिकेचा रोल साकारणार आहे. क्वान्टीको मालिका आणि या चित्रपटाच्या शूटींगच्या तारखा एकाच दिवशी येत होत्या. आता त्यावर मार्ग निघाला असून प्रियंका लवकरच शूटींगला सुरुवात करेल.

यापूर्वी क्वान्टीको मालिके प्रियंकाला पिपल्स चॉईस अवॉर्ड मिळला होता. तिने त्यातून प्रेक्षकांची मने जिंकली होती.  

 

 

A video posted by therock (@therock) on