मुंबई : बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा मालदीवमध्ये एका अपघाताची शिकार होतात होता थोडक्यात वाचली. प्रियंका मालदीवमध्ये बोट रायडिंगची मजा घेत होती. तेव्हा तिची बोट समुद्रातील एका खडकावर आदळली. कोस्ट गार्डने त्वरित हालचाल करत तिला वाचविले.
प्रियंका चोपडा मालदीव सरकारच्या निमंत्रणामुळे त्या देशात गेली होती. एका कार्यक्रमात सहभाग होण्यासाठी ती माले येथे जात होती तेव्हा तिच्या नावेचा अपघात झाला. ट्विटरवरून तिने आपल्या फॅन्सला ही माहिती दिली. तिने सांगितले की, आमची बोट आता-आता एका मोठ्या खडकावर आदळली. मी बसून कोस्ट गार्डची वाट पाहत आहे.
त्यामुळे प्रियंका त्या कार्यक्रमाला पोहचू शकली नाही. प्रियंकाने ट्विट करून सांगितले की, बचाव कार्य! उफ्फ!! शेवटी हॉटेलमध्ये पोहचली जे शानदार आहे. कोस्ट गार्डचे धन्यवाद.....
Rescue operation!!! Phew! Finally made it to the hotel! Which is stunning! Thank u coast Guard! #MaldivesAdventure pic.twitter.com/z5018qoFQ8— PRIYANKA (@priyankachopra) January 8, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.