ट्रम्प विरोधातल्या मोर्चाला प्रियांका चोप्राचा पाठिंबा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची नुकतीच शपथ घेतली.

Updated: Jan 23, 2017, 06:45 PM IST
ट्रम्प विरोधातल्या मोर्चाला प्रियांका चोप्राचा पाठिंबा  title=

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची नुकतीच शपथ घेतली. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होताच, जगभरातल्या महिलांनी काल निषेध रॅली काढली होती. या आंदोलनाला अभिनेत्री प्रियांका चोप्रानं पाठिंबा दिला आहे. याबाबतचं ट्विट प्रियांकानं केलं आहे. या मोर्चामध्ये सहभागी होता आलं नसल्याची खंतही तिनं व्यक्त केली आहे.  

जगभरातल्या 70 देशांमध्ये ट्रम्प यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. ट्रम्प यांच्याविरोधात वॉशिंग्टनमध्ये काढण्यात आलेल्या सिस्टर रॅलीमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

अमेरिकेच्या विविध शहरात सहाशे ठिकाणी ट्रम्पविरोधी आंदोलन करण्यात आलं. जवळपास 5 लाख महिला या आंदोलनात सहभागी झाल्या. लंडनमध्येही ट्रम्प यांच्याविरोधात निदर्शनं करण्यात आली.

ग्रीसमध्येही महिलांनी अमेरिकन दूतावासाबाहेर आंदोलन करत ट्रम्प यांचा निषेध केला. 20 जानेवारीला ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यापासूनच त्यांच्या विरोधात महिलांनी आंदोलन सुरु केलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी महिलांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधानं केली आहेत, त्याच्या निषेधार्थ ही आंदोलनं करण्यात आली.