प्रियांका चोप्रा ऑस्करमध्ये पुरस्कार प्रदान करणार

लॉस एंजेलिस : सध्याची आघाडीची बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राला मोठा जागतिक मान मिळालाय. 

Updated: Feb 2, 2016, 11:23 AM IST
प्रियांका चोप्रा ऑस्करमध्ये पुरस्कार प्रदान करणार  title=

लॉस एंजेलिस : सध्याची आघाडीची बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राला मोठा जागतिक मान मिळालाय. 

प्रियांका चोप्रा यंदाच्या ८८व्या ऑस्कर सोहळ्यात एक पुरस्कार प्रदान करणार आहे. २०१६ च्या स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड अॅवॉर्ड्समध्येही तिने एक पुरस्कार प्रदान केला होता. याच सोहळ्यात तिला 'पीपल्स चॉइस अॅवॉर्ड'ही देण्यात आला होता.

क्विंसी जोन्स, रीस विथरस्पून, स्टीव्ह कॅरेल, जे के सिमन्स आणि जॅरेड लेटो यांसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांसोबत प्रियांका या सोहळ्यात सहभागी होणार आहे.

प्रियांकाचा यंदाच्या वर्षीचा करिअर ग्राफ चढता राहिलाय. अमेरिकन टेलिव्हिजनमध्येही तिनं एन्ट्री घेतली. त्यानंतर पीपल्स चॉईस ऍवॉर्डही तिनं मिळवला. बाजीराव मस्तानीमधल्या भूमिकेचंही तिचं कौतुक झालं. 

ऑस्कर्सच्या ट्विटर हँडलवर इतर मान्यवरांसोबत प्रियांका चोप्राचं नाव असलेला फोटो अपलोड केला गेला आहे. २८ फेब्रुवारीला हा सोहळा लॉस एंजेलिस शहरात हा सोहळा पार पडणार आहे.