पीपल्स चॉईस अॅवॉर्ड पटकावत देसी गर्ल प्रियांकाचा परदेशातही डंका

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोपडा हिनं बॉलिवूडचा डंका परदेशातही वाजवलाय. 'पीपल्स चॉईस अॅवॉर्ड'मध्ये न्यू टीव्ही सीरिजची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रियांका चोपडा हिची निवड करण्यात आलीय. हा अॅवॉर्ड प्रियांकाला थ्रिलर अमेरिकन टीव्ही शो 'क्वांटिको'साठी मिळालाय. 

Updated: Jan 7, 2016, 04:21 PM IST
पीपल्स चॉईस अॅवॉर्ड पटकावत देसी गर्ल प्रियांकाचा परदेशातही डंका title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोपडा हिनं बॉलिवूडचा डंका परदेशातही वाजवलाय. 'पीपल्स चॉईस अॅवॉर्ड'मध्ये न्यू टीव्ही सीरिजची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रियांका चोपडा हिची निवड करण्यात आलीय. हा अॅवॉर्ड प्रियांकाला थ्रिलर अमेरिकन टीव्ही शो 'क्वांटिको'साठी मिळालाय. 

या पुरस्कारासाठी प्रियांकाची स्पर्धा होती ती जेमी ली कर्टिस, एम्मा रॉबर्टस, मर्सिया गे हार्डेन आणि लिया मिशेल यांसारख्या अभिनेत्रींशी...

३३ वर्षीय माजी विश्व सुंदरी प्रियांका 'पीपल्स चॉईस अॅवॉर्ड'मध्ये पहिल्यांदाच सहभागी झाली होती. याबद्दल अगोदर तिला खूप धाकधूकही वाटत होती. 

अवॉर्ड जिंकल्यानंतर प्रियांकानं ट्विटरवर लोकांचे आभार मानलेत. 'मी खूप भाग्यशाली आहे... ज्या लोकांनी माझ्यासाठी वोट केलं त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानते. माझ्या चाहत्यांनो तुमच्याशिवाय मी काहीच नाही' असं प्रियांकानं यावेळी म्हटलंय. 

'क्वांटिको'मध्ये प्रियांका एफबीआयमध्ये भर्ती झालेल्या एलेक्स पॅरिश नावाची एका तरुणीच्या भूमिकेत दिसलीय. अॅवॉर्ड मिळाल्यानंतर बॉलिवूडच्या अनेक हस्तींनी प्रियांकाचं अभिनंदन केलंय.