मुंबई : अभिनेत्री राधिका आपटेची भूमिका असलेला पार्च्ड या सिनेमाचा प्रोमो रिलीज झाला आहे.
हा सिनेमा राजस्थानातील महिला आणि रूढींवर आधारीत असल्याचं दिसतोय, महिलांचं स्वातंत्र्य आणि पुरूष प्रधान संस्कृतीचा दबाव आणि त्यातून तीन महिलांनी काढलेला मार्ग यात दाखवण्यात आलाय.
पण सिनेमाची खरी पार्श्वभूमी सिनेमा पाहिल्यानंतरच कळणार आहे, या सिनेमात अनेक बोल्ड सीन असल्याचं दिसतंय, खरं तर या प्रोमोमधील भाषेवरून या सिनेमाच्या प्रोमोला सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिली कशी असाही प्रश्न आहे.
मात्र सिनेमा हा दमदार असल्याचं या प्रोमोवरून दिसतंय, त्यात राधिका आपटेसारखी बोल्ड भूमिका साकारणारी अभिनेत्री असल्याने, तिच्या भूमिकेच्या जोरावर दिग्दर्शकालाही समाजाचं खरंखुरं चित्र दाखवण्यास मदत झाली आहे.