मुंबई : 'लय भारी' फेम मराठी अभिनेत्री राधिका आपटेचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असल्याचं सांगण्यात येत असलं, तरी हे फोटो आपले नसल्याचं अभिनेत्री राधिका आपटेने स्पष्ट केलं आहे.
राधिकाच्या या स्पष्टीकरणानंतर हे फोटो मॉर्फ केले असू शकतात, राधिका आपटेचे फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर कुणी टाकले असतील, तर ही एक गंभीर बाब होऊ शकते, कारण व्हॉटस अॅप सारख्या अॅप्लिकेशनवर करता करविता सहज हाती येत नाही.
आता पुन्हा एकदा सोशल मीडियामुळे सेलिब्रिटीची प्रायव्हसी धोक्यात आली आहे. ‘लय भारी’फेम मराठी अभिनेत्री राधिका आपटेचे न्यूड फोटो सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले आहेत.
राधिका आपटे ही फक्त मराठीचं नाही, तर हिंदी सिनेमातही नावाजलेली अभिनेत्री आहे, राधिकाने नुकतंच रितेश देशमुखसोबत लय भारी सिनेमात काम केलं आहे. शिवाय बदलापूर, हंटर या सिनेमांमध्येही राधिका झळकणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.