'रईस'ची १०० कोटींच्या क्लबकडे वाटचाल

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानचा 'रईस' हा सिनेमा १०० कोटींच्या क्बलच्या दिशेने जोरदार वाटचाल करतोय. या सिनेमाने पाच दिवसांत तब्बल ९३.२४ कोटींचा गल्ला जमवलाय. 

Updated: Jan 30, 2017, 04:51 PM IST
'रईस'ची १०० कोटींच्या क्लबकडे वाटचाल title=

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानचा 'रईस' हा सिनेमा १०० कोटींच्या क्बलच्या दिशेने जोरदार वाटचाल करतोय. या सिनेमाने पाच दिवसांत तब्बल ९३.२४ कोटींचा गल्ला जमवलाय. 

रविवारच्या दिवशी या सिनेमाने १७.८ कोटींची कमाई केली. पहिल्या दिवशी या सिनेमाने २०.४२ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर २६ जानेवारीच्या दिवशी या सिनेमाने २६.७० कोटी रुपये कमावले. 

शुक्रवारी आणि शनिवारी या सिनेमाने अनुक्रमे १५.६१ आणि १७.८० कोटी कमावले.