राहुल महाजन तिसऱ्यांदा बोहल्यावर! या मॉडेलशी सूत जमले

अभिनेता राहुल महाजन याच्या जीवनात आणखी एक तरुणी आली आहे. याबाबतची माहिती राहुलनेच दिलेय. 

Updated: Jan 1, 2016, 06:46 PM IST
राहुल महाजन तिसऱ्यांदा बोहल्यावर! या मॉडेलशी सूत जमले
सौजन्य - फेसबुक

मुंबई : वादग्रस्त ठरलेला अभिनेता राहुल महाजन याच्या जीवनात आणखी एक तरुणी आली आहे. याबाबतची माहिती राहुलनेच दिलेय. राहुल यांने मॉडेल अमृता मानेसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय आणि म्हटलेय, नवीन वर्षाची नवी सुरुवात. 

राहुलला अमृता माने हिच्या रुपात नवीन मैत्रीण मिळाली आहे. दरम्यान, राहुल महाजनची पूर्वीची पत्नी डिम्पी गांगुली हिने घटस्फोटानंतर दुबईतील एका उद्योगपतीसोबत लग्न केले. आता राहुलही लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे.

राहुलने अलिकडेच गोव्यात सुट्टीचा मनमुराद आनंद लुटला. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पहिल्यांदाच अमृता आणि माझी केरळमध्ये भेट झाली. त्याच क्षणी मला तिच्यात काहीतरी नवीन असल्याचे दिसले. म्हणून मी तिच्यासोबतचा माझा हा फोटो टाकत असून ही 'नवीन वर्षाची नवीन सुरुवात आहे', असे राहुलने म्हटलेय.

तर दुसरीकडे त्यांने म्हटलेय, माझा प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. मला देव आणखी एक संधी देईल. सध्या मी आणि अमृता एकमेकांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे राहुलने म्हटलेय.

 

Party time with SG and Amruta Mane

Posted by Rahul Mahajan on Wednesday, 30 December 2015

 

#Goa calling new year celebrations New beginnings 

Posted by Rahul Mahajan on Tuesday, 29 December 2015

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x