जब्याची शालू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

नागराज मंजुळे दिग्दर्शित फँड्री या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठी पसंतीची पावती दर्शवली होती. यातील सोमनाथ अवघडे आणि सुरज पवार यांच्या भूमिकेचे कौतुक सर्वांनीच केले होते. 

Updated: Jul 8, 2016, 09:14 AM IST
जब्याची शालू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला title=

मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित फँड्री या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठी पसंतीची पावती दर्शवली होती. यातील सोमनाथ अवघडे आणि सुरज पवार यांच्या भूमिकेचे कौतुक सर्वांनीच केले होते. 

या चित्रपटात जब्याला जी मुलगी आवडते त्या शालूची भूमिका राजेश्वरी खरात हिने केली होती. यात तिने एकही डायलॉग म्हटलेला नसला तरी ती चित्रपटात चांगलीच भाव खाऊन गेली होती. 

फँड्रीनंतर आता राजेश्वरी लवकरच अॅटमगिरी या चित्रपटातून पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.  प्रदीप टोनगे दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर अलीकडेच रिलीज करण्यात आला. राहुल पुणे हा अभिनेतासुद्धा या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे.