दिग्दर्शक राजू हिरानींचा अपघात, आयसीयूमध्ये उपचार सुरू

पीकेचे दिग्दर्शक राजू हिराणी यांचा अपघात झालाय. मध्यरात्री बाईक चालवतांना वळणावर घसरून त्यांचा अपघात झाला, त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

Updated: Aug 11, 2015, 12:28 PM IST
दिग्दर्शक राजू हिरानींचा अपघात, आयसीयूमध्ये उपचार सुरू title=

मुंबई: पीकेचे दिग्दर्शक राजू हिराणी यांचा अपघात झालाय. मध्यरात्री बाईक चालवतांना वळणावर घसरून त्यांचा अपघात झाला, त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

राजू हिरानी यांना पहाटे तीन वाजता लिलावती हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलंय. त्यांच्या जबड्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं कळतंय. आज त्यांच्यावर महत्त्वाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

लिलावती हॉस्पिटलमध्ये डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली हिरानी यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजू हिरानी सध्या 'साला खडूस' चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट सध्या अंतिम टप्प्यात आहे. यापूर्वी मुन्नाभाई सीरिजचे चित्रपट आणि पीके दिग्दर्शित केलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.