ऋतिक-सुझान अजुनही एकत्रच; राकेश रोशन यांचा खुलासा

बॉलिवूडचा अभिनेता ऋतिक रोशन आणि सुझान खान यांचा घटस्फोट झालाय, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, ऋतिकचे वडील राकेश रोशन यांनी मात्र ही गोष्ट मान्य करण्यास नकार दिलाय. घटस्फोटानंतरही ऋतिक-सुझान एकत्रच आहेत, असं राकेश रोशन यांनी म्हटलंय. 

Updated: May 21, 2015, 06:57 PM IST
ऋतिक-सुझान अजुनही एकत्रच; राकेश रोशन यांचा खुलासा  title=

मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता ऋतिक रोशन आणि सुझान खान यांचा घटस्फोट झालाय, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, ऋतिकचे वडील राकेश रोशन यांनी मात्र ही गोष्ट मान्य करण्यास नकार दिलाय. घटस्फोटानंतरही ऋतिक-सुझान एकत्रच आहेत, असं राकेश रोशन यांनी म्हटलंय. 

'भांडणं कोणत्या घरात होत नाहीत. मीडियाने या आमच्या घरातील गोष्टीला विनाकारण वाढवलं. प्रत्येक जण डुग्गूच्या आयुष्यात दखल देण्याचा प्रयत्न करतोय... त्याच्या व्यक्तीगत जीवनात डोकावणं योग्य नाही' असं राकेश रोशन यांनी म्हटलंय. 

हे खरं आहे की दोघांमध्ये खटके उडाले... त्यांचा घटस्फोटही झालाय... मात्र, त्याचा अर्थ असा नाही की दोघे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे झाले आहेत. जीवनात चढ-उतार येत असतात. ते एकमेकांपासून वेगळे झाले ही फक्त अफवा आहे... लोकांनी त्यांच्या व्यक्तीगत जीवनाबाबत चर्चा करणं बंद केलं पाहिजे, असंदेखील राकेश रोशन म्हणतायत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.