करू नका नक्कल, दीपिकासाठी तो करणार टक्कल

अभिनेता रणवीर सिंहने आपल्या लांब सडक आणि काळ्या केसांचा बळी देणार आहे, रणवीर टक्कल करणार आहे, मात्र यासाठी रणवीरचा उत्साह दांडगा आहे.

Updated: Oct 7, 2014, 05:06 PM IST
करू नका नक्कल, दीपिकासाठी तो करणार टक्कल title=

मुंबई : अभिनेता रणवीर सिंहने आपल्या लांब सडक आणि काळ्या केसांचा बळी देणार आहे, रणवीर टक्कल करणार आहे, मात्र यासाठी रणवीरचा उत्साह दांडगा आहे.

आगामी चित्रपट बाजीराव मस्तानीसाठी रणवीर टक्कल करणार आहे. चित्रपटाचे निर्माते संजय लीला भन्साली आहेत. या चित्रपटात दीपिकाची पादुकोणची मुख्य भूमिका आहे.

संजय, दीपिका आणि रणवीर हे त्रिकुटाने या आधी गोलियों की रासलीला राम-लीला सारखा चित्रपट हीट ठरवला आहे.

बाजीराव मस्तानी हा संजय लीला भन्सालीचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, या चित्रपटासाठी संजय लीला भन्सालीची पहिली पसंद ही सलमान खान आणि ऐश्वर्या रॉय हे होते, मात्र असं होऊ शकलं नाही.

यानंतर त्यांनी यासाठी सलमान सोबत करीनाला घेण्याचा विचार केला, मात्र हे शक्य होऊ शकलं नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.