मुंबई: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरनं बांद्र्याच्या पाली हिल परिसरामध्ये घर विकत घेतलं आहे. या घरासाठी रणबीरनं तब्बल 35 कोटी रुपये मोजल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वास्तू पाली हिल या टॉवरमध्ये रणबीरनं सातव्या मजल्यावर 2,460 स्क्वेअर फुटांचं घर खरेदी केलं आहे. यासाठी रणबीरनं 1.42 लाख रुपये प्रती चौरस फूट मोजले आहेत. उपनगरामध्ये प्रती चौरस फुटासाठी मोजण्यात आलेली ही सगळ्यात जास्त रक्कम असल्याचं बोललं जात आहे.