रणबीरच्या 'त्या' दिल्लीवाल्या गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा

कतरिनाशी ब्रेकअपनंतर बॅालिवूड अभिनेता रणबीर कपूरचे दिल्लीस्थित गर्लफ्रेंडशी अफेयर चालू असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. मात्र आज पहिल्यांदाच त्या दिल्लीवाल्या गर्लफ्रेंडने याबाबत खुलासा केलाय. रणबीरची गर्लफ्रेंड तर दूरच मी साधी त्याची फॅनही नाही असे खुद्द भारती मल्‍होत्राने म्हटलंय.

Updated: May 23, 2016, 01:54 PM IST
रणबीरच्या 'त्या' दिल्लीवाल्या गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा

मुंबई : कतरिनाशी ब्रेकअपनंतर बॅालिवूड अभिनेता रणबीर कपूरचे दिल्लीस्थित गर्लफ्रेंडशी अफेयर चालू असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. मात्र आज पहिल्यांदाच त्या दिल्लीवाल्या गर्लफ्रेंडने याबाबत खुलासा केलाय. रणबीरची गर्लफ्रेंड तर दूरच मी साधी त्याची फॅनही नाही असे खुद्द भारती मल्‍होत्राने म्हटलंय.

भारतीचा खुलासा 

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की ती रणबीरला कधीही  भेटली नाही  आणि त्याच्या बहिणीलाही नाही. रणबीरबरोबरचे माझे अफेयर ही एक केवळ अफवा आहे व याचा मला मनस्ताप होतो. रणबीर हा भले एक चांगला अॅक्टर असेल पण मला रणबीर कधीच आवडला नाही.

भारतीच्या या खुलाश्यानंतर रणबीरसोबतचे तिचे अफेयर केवळ एक अफवा असल्याचे समोर आलेय.