रणवीर सिंगच्या कॉन्डोम्सची जाहिरात सुपर हिट

बॉलिवूडमध्ये टॉपचे कलाकार कधीच कॉन्डोम्सच्या जाहिरातीत दिसत नाही.

Updated: Apr 27, 2014, 09:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडमध्ये टॉपचे कलाकार कधीच कॉन्डोम्सच्या जाहिरातीत दिसत नाही. पण सध्याचा लिडिंग स्टार रणवीर सिंगने ड्युरेक्स कॉन्डोम्सच्या जाहिरातीत कामं करण्यास सुरूवात केली आहे.
रणवीरच्या या जाहिरातीबाबत सोशल मीडियावर जाहिरात कळताच सगळ्यांनी ही जाहिरात यू-ट्यूबवर पाहिली. काही लोकांनी या जाहिरातीस हिट ठरवले, तर काही लोकांनी या जाहिरातीवर बकवास अशी टिप्पणी केली, असं असलं तरी या जाहिरातीस २४ तासांत १ लाख हिट्स मिळाले आहेत.
रणवीर सिंगने सांगितलं की, `सुरक्षेच्या कारणास्तव जनकल्याणासाठी कॉन्डोम्सच्या उपयोगाचा प्रचार करणे हेच माझे काम आहे`. पुढे रणवीर हे देखील म्हणाला की, मी नेहमीच माझ्या पर्समध्ये कॉन्डोम्स ठेवतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.