रात्रीचा 'खेळ' संपलाय असं तुम्हालाही वाटतंय का?

अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी रात्रीस खेळ चाले ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. सुरुवातीपासूनच या मालिकेतल्या रहस्यमयी घटना प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरण्यात यशस्वी ठरलीय. या मालिकेचा शेवट काय होणार? याचे काही फोटो सध्या सोशल वेबसाईटवर व्हायरल झालेत. पण, थांबा... कदाचित मालिकेचा हा शेवट होणार नाही.

Updated: Oct 7, 2016, 09:31 PM IST
रात्रीचा 'खेळ' संपलाय असं तुम्हालाही वाटतंय का? title=

मुंबई : अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी रात्रीस खेळ चाले ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. सुरुवातीपासूनच या मालिकेतल्या रहस्यमयी घटना प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरण्यात यशस्वी ठरलीय. या मालिकेचा शेवट काय होणार? याचे काही फोटो सध्या सोशल वेबसाईटवर व्हायरल झालेत. पण, थांबा... कदाचित मालिकेचा हा शेवट होणार नाही.

सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये पोलीस सुशल्या आणि निलिमा वहिनी या दोघींना अटक करून घेऊन जाताना दिसत आहेत. पण, कदाचित हाच शेवट तुम्हाला मालिकेच्या शेवटी टीव्हीवर पाहायला मिळणार नाही. 

याचं कारण म्हणजे, या कार्यक्रमाचा शेवट काय असेल? याची कल्पना यातील कलाकारांनासुद्धा नाहीय. कारण मालिकेच्या दिग्दर्शकाने प्रत्येक पात्रासोबत एक वेगळा शेवट चित्रीत केला आहे. त्यामुळे नेमका सूत्रधार कोण? याची उत्सुकता सामान्य प्रेक्षकांइतकीच या कलाकारांनाही लागून राहिलीय. 

आता या मालिकेचा शेवट नेमका काय होणार हे पाहण्यासाठी तुम्हाला २२ ऑक्टोबरची वाट पाहावी लागणार आहे.