मुंबई : 68 वर्षाचे निर्माते आणि दिग्दर्शक रवि चोप्रा यांचे बुधवारी दुपारी साडेतीन वाजता ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झाले.ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक दिवंगत बी. आर. चोप्रा त्यांचे वडिल होते. रवि गेल्या तीन वर्षापासून फुप्फुसाच्या विकाराने त्रस्त होते. मात्र गेल्या गुरुवारी त्यांना जास्त त्रस होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या मागे पत्नी रेणु आणि दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.
1975ला अमिताभ बच्चन, सायरा बानो आणि शम्मी कपूर ‘जमीर’ या चित्रपटापासून त्यांनी दिग्दर्शनास प्रारंभ केला.
या चित्रपटाला फारशी लोकप्रियता मिळाली नाही.
पाच वर्षानी 1980 साली राजधानी एक्स्प्रेसवर आधारित ‘द बर्निग ट्रेन’,
1983 साली दिलीप कुमार, अनिल कपूर अभिनित ‘मशाल’ 1986 साली राज बब्बर यांच्यासोबत ‘दहलीज’ या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले.
‘महाभारत’ या मालिकेचे दिग्दर्शन चोप्रा यांचेच होते.
छोटय़ा पडद्यावर मिळालेल्या या यशानंतर पुन्हा त्यांनी चित्रपट दिग्दर्शनाकडे मोर्चा वळवला.
आपल्याच वडिलांच्या कथेवर आधारित आणि अमिताभ बच्चन व हेमा मालिनी अभिनित ‘बागबान’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले.
त्यानंतर ‘बाबुल’ चित्रपटाची निर्मिती केली. बी. आर. चोप्रा यांच्या निधनानंतर रवि चोप्रा यांनी बी. आर. फिल्मची धुरा आपल्या हाती घेतली.
त्यांच्या कंपनीत ‘भूतनाथ’ आणि ‘भूतनाथ रिटर्न्स’ हे चित्रपट तयार झाले. त्यांचा दुसरा मुलगा अभय अभिनेता म्हणून लवकरच चित्रपटात काम करणार असल्याचे समजते.
अमिताभ बच्चन यांनी रवि चोप्रा यांच्या निधनाबद्दल टि¦टरवरून आपला शोक व्यक्त केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.