ऋषी कपूर अडचणीत, महिला पत्रकाराला बोलले 'इडियट'

ऋषी कपूर आणि वाद यांचं एक वेगळच नातं आहे. कधी बीफच्या वादात फसले तर कधी ट्विट करून वादात फसले. आता एका नवीन वादात ऋषी कपूर फसले आहेत.

Updated: Apr 15, 2015, 07:06 PM IST
ऋषी कपूर अडचणीत,  महिला पत्रकाराला बोलले 'इडियट'  title=
मुंबई : ऋषी कपूर आणि वाद यांचं एक वेगळच नातं आहे. कधी बीफच्या वादात फसले तर कधी ट्विट करून वादात फसले. आता एका नवीन वादात ऋषी कपूर फसले आहेत.
 
यावेळी त्यांनी एका महिला पत्रकाराला उद्देशून अपशब्द वापरले आहेत. एका कार्यक्रमामध्ये महिला पत्रकाराने कॅटरिना आणि कपूर फॅमिलीमध्ये झालेल्या डिनरच्या कार्यक्रमात ऋषी कपूर का सहभागी नव्हते, असा प्रश्न विचारला. त्यानंतर संतापून ऋषी कपूर त्या महिला पत्रकाराला अर्वाच्च भाषेत खडे बोल सुनावले. महिला पत्रकाराला बोलतांना आपण काय बोलतोय याचे भानही त्यांना नव्हते. 
 
पत्रकांरानी  ऋषी कपूर यांना कॅटरिनाबाबत प्रश्न विचारल्यानंतर, मला फक्त या कार्यक्रमाबद्दल माहिती आहे, म्हणून मी येथे उपस्थित आहे. कॅटरिनाचं नाव ऐकताच  त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी थेट त्या महिला पत्रकाराला 'इडियट' आणि 'बेवकूफ' बोलून टाकले. ऋषी कपूर बोलले की "बेवकूफों जैसा सवाल पूछते हैं और खूद को पत्रकार कहते हैं".
 
आता रणबीर कपूर हा ऋषी कपूर यांच्या बचाव करण्यासाठी काय बोलतो हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.