परिणीतीला मिळालेल्या अॅवॉर्डची ऋषी कपूर यांनी केली टिंगल

आपल्या वक्तव्यांमुळे अभिनेते ऋषी कपूर बऱ्याचदा चर्चेत असतात. ट्विटरवर त्यांची अनेक वादग्रस्त वक्तव्य चर्चेचा विषय ठरलीत. आत्ताही त्यांच्या अशाच एक वक्तव्यामुळे ते चर्चेत आहेत. 

Updated: Jan 29, 2016, 05:15 PM IST
परिणीतीला मिळालेल्या अॅवॉर्डची ऋषी कपूर यांनी केली टिंगल title=

मुंबई : आपल्या वक्तव्यांमुळे अभिनेते ऋषी कपूर बऱ्याचदा चर्चेत असतात. ट्विटरवर त्यांची अनेक वादग्रस्त वक्तव्य चर्चेचा विषय ठरलीत. आत्ताही त्यांच्या अशाच एक वक्तव्यामुळे ते चर्चेत आहेत. 

आता ऋषी कपूर यांच्या निशाण्यावर आलीय अभिनेत्री परिणीती चोपडा...  नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या स्टारडस्ट अॅवॉर्ड सोहळ्यात 'स्टाईल आयकॉन ऑफ द इअर' हा अॅवॉर्ड देऊन परिणीतीचा गौरव करण्यात आला होता. परिणीतीनं कमी केलेल्या आपल्या वजनामुळे तिला हा पुरस्कार देण्यात आला होता, हे विशेष.

यावरच, ऋषी कपूर यांनी टीका केलीय. वजन कमी केल्यामुळे परिणीतीला अॅवॉर्ड देण्यात आलंय... यावर आपल्याला विश्वासच बसत नसल्याचं ऋषी कपूर यांनी म्हटलंय. मला कुणी वजन वाढवण्यासाठी अॅवॉर्ड देऊ शकतं का? असं म्हणत त्यांनी याची टिंगलही केलीय. 

जर सगळ्यांनाच खुश करायचंय तर अॅवॉर्डची गरजच काय? असा प्रश्नही त्यांनी विचारलाय.